Ticker

6/recent/ticker-posts

14 एप्रिल आंबेडकर जयंती नीमित्त बेला (भंडारा) येथे एकदिवसीय मोफत आरोग्य शिबिर संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-बेला (भंडारा) येथे दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी समता पर्व म्हणजेच 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती व 14 एप्रिल संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर जयंती च निमित्त साधून एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर्स, तज्ञांमार्फत उपचार व सेवा देण्यात आली.. स्त्रीरोग तज्ञ डॉ. कृष्णा शेंडे सर, बालरोग तज्ञ लांजेवार सर, मूळव्याध व भगंधर तज्ञ डॉ. गभने सर, जनरल फिजीसियन डॉ.निंबारते सर, डॉ. गजभिये सर  व नेत्र रोग तज्ञ डॉ.अनुरध्वज रंगारी सर .. डॉ. खांडेकर पथोलॉजी भंडारा तर्फे बीपी व शुगर चेक करुण देण्यात आले. सकाळीं 11 ते दुपारी 3 पर्यंत झालेल्या या शिबिराला 200 पेशंट तसेच गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.सगळ्यां तज्ञांनी यशस्वीरीत्या पेशंटनां मोफत उपचार व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपस्थित बेला गावचे सरपंच सौ. शारदा ताई शेंडे, ग्रामपंचायत  सदस्या चवळे ताई व ईतर सदस्य गण उपस्थित होते. कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन संम्बोधी बुध्द विहार महीला मंडळ, सिद्धार्थ नवयुवक मंडळ तसेच नवतरुण जय भीम ग्रुप तर्फे करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मंडळाचे अध्यक्ष प्रभाताई गजभिये,  प्रिती ताई गजभिये, पंचफुला ताई मेश्राम, वीरांगना भिवगडे, साधना ताई कांबळे, सीमा कांबळे, साखराताई मेश्राम, बबिता भिवगडे, रसिका भिवगडे, सुनंदा भिवगडे, मीराबाई बंसोड, राजश्री भिवगडे, श्री.रक्षित दहिवले, श्री. यमराज जी भिवगडे, श्री. दीपक जी कांबळे, श्री. रोशन जी कांबळे, संदीप जी हुमने, नवतरुण जय भीम ग्रुप चे हिमांशू भांबोळकर, शुभम मेश्राम, अक्षय गजभिये व भिमकन्या ग्रुप चे  सानिया भोयर., साक्षी भिवगडे.,. अनुश्री तिरपुडे ,  करिश्मा मेश्राम.,  प्रिन्सी कांबळे., तमन्ना गजभिये.,परी भोयर, . हिमांशी तिडके , अर्पिता गजभिये इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या