नागपूर:-रमाई भजन मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व जाहीर सत्कार नागपूर भीम जयंती निमित्त दिनांक 15 4 2025 रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत रमाबाई बुद्ध विहार इंदापूर तहसील भिवापूर जिल्हा नागपूर भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी रमाई मंडळाच्या गायिका जोशना ताई मेश्राम यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व गीत सादर केले व त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी तेथील सरपंच सुनीता तांगडे भीमशक्ती युवक संघटना इंदापूर रमाई मंडळाच्या गायिका सौ जोशना मेश्राम वर्षा शेंडे दीक्षा चव्हाण वंदना म्हैसकर स्वाती वाघमारे अर्चना मोटघरे उद्धव वाघमारे सपना ढेकले बॅन्जो वादक राजानंद बारसागडे पेटीवादक बोरकर साहेब ढोलक वादक जंजाळ साहेब आणि सर्व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन सुनिता तांगडे यांनी केले.
0 टिप्पण्या