——————————————
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-येत्या कांही महिण्यात ग्राम पंचायत, जि.प.व पं.स.तसेच खरेदी-विक्री या स्था.स्व.संस्थेच्या निवडणुका होणार असल्याचे निमित्ताने सर्वपक्षीय जि. प.व पं.स.चे माजी सदस्य हे सगळे कुणाच्या मौतीत,लग्नात तर कुणा —च्या एंगेजमेंन्ट या सारख्या ठिकाणी झाडून सगळे पुढारी गोळा होत/येत असल्याचे चिञ हाळी-हंडरगुळी सह परिसरातील गावागावात दिसत आहे येत्या कांही महिण्यात स्था.स्व.संस्था अंतर्गत असलेल्या जि.प.व पं.स.ग्रा. पं.तसेच खरेदी-विक्री संघ,म.उदगीर यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.त्यात सध्या सर्वञ "शादी की शहनाई" धुमधडाक्यात वाजत आहे. म्हणुन लग्नात व मौतीत व तेराव्यात पण अनेक पुढारी उपस्थित होताहेत. व फोटोसेशन करुन ते फोटो सोशल मिडियावर अपलोड करत असल्याचे दिसत आहे.तसेच लग्न,मुंज,जावळ, साखरपुडा,तेरावं आणि मयताची माती या सारख्या ठिकाणी सर्वच पक्षातील स्वयंघोषित पुढारी,नेते हे मोठ्यासंख्येनी गोळा होतात.आणि "हम है यहाॅं के....!! असा आर्विभाव दाखवत हिंडताना पुढारी दिसतात.व सोशल मिडियावर फोटो शेअर करुन स्व:ताच्याच चेल्या-चपाट्याकडून स्व:ताचीच वाहवा करुन घेतात..!
तसेच आगामी स्था.स्व.संस्थेची निवडणुक लढवू इच्छिणारे कांही इच्छूक "बीन बुलाये बाराती" प्रमाणे अनेकांच्या लग्न सोहळ्यात उपस्थित राहतात.अशी चर्चा हाळीत सुरु आहे
0 टिप्पण्या