चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : शहरातील खोब्रे प्लाट दरबान सोसायटी येथील सतिश मांडवकर यांच्या घराला आग लागुन फ्रिज, टिव्ही पंखा व ईतर सामान जळुन अंशी हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल सायंकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर महिती काल दिनांक 29/04/2025 रोज मंगळवारला सायंकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान सतिश मांडवकर रा. खोब्रे लेआऊट दरबान सोसायटी यांच्या घरी फ्रिजला अचानक भिषन आग लागुन भडका झाला व घरातील फ्रिज, टिव्ही फॉन, गादी कपड़े व ईतर सामान जळुन खाक होऊन जवळपास अंशी हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.
सदर या दरम्यान अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले पण अग्निशमन येन्या आधीच सर्व सामान जळुन खाक झाले होते. अग्निशमन दल यांनी पाण्याचे फवारे मारुन पुर्णता आग विजविण्यात आली. यात कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही याबाबत स्थानिक तहसीलदार यांना माहिती देऊन महसुल विभाग अधिकारी समीर वाटेकर व तलाठी यांनी घटणास्थळी येवुन या घटनेचा पंचनामा करून पंचाहात्तर हजार रुपयाचे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
.
0 टिप्पण्या