चित्रा न्युज प्रतिनिधी
परभणी - मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने परभणीत निदर्शने करत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले आहे.
ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल विजय शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे संपूर्ण भारतीय सेनेचा अपमान झाला, त्याचे वक्तव्य हे देशद्रोही आहे, त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे परभणी उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती, युवा उप जिल्हाध्यक्ष मुजफ्फर खान, जिल्हा सचिव युसुफ कलीम, संदीप खाडे, रंजीत मकरंद, गणेश गाडे, प्रमोद कुटे, मजर खान आदींनी केली आहे.
0 टिप्पण्या