चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :- जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे निर्दोष भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण तीव्र निषेध करीत आहोत.महाराष्ट्रातून आलेल्या काही पर्यटक जखमी आहेत तर दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची त्यांना शक्ती प्राप्त होवो अशी शोकभावना न.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
जम्मू काश्मीर प्रगती करण्यासाठी भारत सरकार काम करीत आहे.त्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये5 पर्यटन वाढू लागले आहे. ते रोखण्यासाठी दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे.या हल्ल्याचा तीव्र निषेध आपण करीत असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी म्हटले आहे.


0 टिप्पण्या