Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षिका ज्योती नागलवाडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2024-2025या वर्षात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी या श्रेणीत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. याबद्दल त्यांना ₹30,000 रोख बक्षीस देण्यात आले.

तुमसर येथील जिजामाता जिल्हा परिषद शाळा ही खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेमुळे बंद होण्याच्या स्थितीत आली होती. अशा वेळी शिक्षिका ज्योती नागलवाडे आणि प्रीती आत्राम यांनी शाळेला नवजीवन देण्यासाठी अथक प्रयत्न केले.

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी त्यांनी नवोपक्रम राबवले, पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले, तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षणात सकारात्मक बदल घडवले. विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या लघु व्हिडिओंच्या माध्यमातून वाचन-लेखन क्षमतेत सुधारणा केली.

त्यांच्या या अभिनव प्रयोगांमुळे शाळेची विद्यार्थी गुणवत्ता व संख्या वाढली आणि शाळा नावारूपास आली.

श्रीमती नागलवाडे यांचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते आणि शिक्षण विभागाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या