चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-दि.१४ रोजी उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सहात व आनंदात संपन्न झाली.
स.१० वा.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन व ध्वजारोहन करण्यात आले.तर ४ वा.बौध्द वाड्यातुन मेन मार्केट ते मेन रोडवरुन बौध्दवाडा अशी बाबासाहेबांच्या तैलचिञाची सजवलेल्या ट्रॅक्टर मधून वाजत- गाजत भव्यदिव्य अशी मिरवणुक काढण्यात आली.यावेळी प्रा.डाॅ. एन.टी.कांबळे,प्रा.मधूकर कदम, वाहक विष्णू कांबळे,मेजर बळी कांबळे,प्रा.नारायण कांबळे हे व शेकडो बौध्द उपासक,उपासीका मिरवणुकीत सहभागी होते. तसेच
वाढवणा पोलीसांचा मोठा फौज फाटा यावेळी उपस्थित होता..
0 टिप्पण्या