Ticker

6/recent/ticker-posts

आक्रोश मोर्चा सकल जैन समाज अकलूज.उपस्थित प्रांतधिकारी यांना निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-विलेपार्ले मुंबई येथे पार्श्वनाथ दिगंबर जैन  मंदिर मुंबई महानगर पालिकाने बुलडोझरने पाडले.तेथील जिनमुर्ती व जिनशास्त्र याची विटंबना व अवहेलना झाली. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण सकल जैन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्या तीव्र भावना  व्यक्त करण्यासाठी 
जाहीर आक्रोश मोर्चा गुरुवार दिनांक २४/ ४/ २५ रोजी सकाळी ९  वाजता जाहीर आक्रोश मोर्चाचे आयोजन सकल जैन समाज, अकलूज यांच्या वतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी खासदार मा.श्री. धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील* तसेच शांतता व समन्वय समिती,अकलूज चे कार्याध्यक्ष व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा.श्री. शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थित प्रांतधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सकल जैन समाजातील बंधू भगिनी आणि तरुण बांधवांची प्रचंड उपस्थित होती.
तसेच सकाळी ठिक 8:30 वा.श्री‌ 1008 भगवान महावीर मंदिर पासुन हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चाची  सुरुवात झाली त्या मध्ये लहान मुलांपासुन वृद्ध व्यक्तींचा समावेश होता या मध्ये परवा जम्मू काश्मीर (पेहलगाम) हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली व भ्याड हल्ल्याचा निषेध करणारे फलक होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी समाजाचे यांमध्ये श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव, श्री नवदेवता जैन मंदिर, आदिनाथ जैन मंदिर, श्री बाहुबली जैन मंदिर, श्री महावीर जैन मंदिर, श्री मुनीसुव्रत नाथ, श्री श्वतांबर जैन मंदिर, सुमती जैन महिला मंडळ सौ भाग्यश्री दोशी यांचे पदाधिकारी व सदस्य होते 
अध्यक्ष श्री इंद्रराज दोशी, सेक्रेटरी श्री योगेश गांधी, श्री सत्यजित दोशी, श्री सतीश व्होरा, सुनील दोशी, श्री महीर गांधी, श्री राजकुमार दोशी, श्री संतोष फडे, श्री वैभव फडे, श्री नवजीवन दोशी, श्री मंगेश गांधी, श्री आशिष फडे यांनी परिश्रम घेतले 
सदर मोर्चेत पाण्याची व्यवस्था श्रीमान शेठ योगेश प्रदिप गांधी यांच्यातर्फे केली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या