चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती :- या देशात १९४८ ला किमान वेतन योजना लागू झाली.मात्र ७५ वर्ष स्वातंत्र्या प्राप्ती नंतरही देशातील कामगारांना किमान वेतन दिले जात नाही हे सरकारचे अपयश आहे.आजही अंगणवाडी कर्मचारी,आशा वर्कर , गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी,बांधकाम कामगार,घरेलु कामगार मोलकरीण,शेतमजूर असे अनेक असंघटित कामगार काम करीत आहेत.त्या सर्वांना त्यांच्या अधिकारापासून,हक्कापासून अलिप्त ठेवण्याचे पाप सरकार करीत आहे.कामगार संघटनांनी गेल्या अनेक वर्षापूर्वी सातत्याने संघर्ष करून सरकारला ४४ कामगार कायदे करण्यास भाग पाडले होते परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या कामगार कायद्याची मोडतोड करून ४ श्रम संहिता लागू करून कामगारांना आपल्या हक्का पासून वंचित ठेवण्याचे काम सुरू केले आहे. तेव्हा या सरकारच्या विरोधात आणि असंघटित कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी देशात अनेक कामगार संघटना काम करीत आहेत.त्यात सर्वात मोठी संघटना आयटक म्हणून काम करीत आहे त्याचे श्रेय संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याना जाते.भविष्याचा वेध घेता हा लढा व्यापक व्हावा व सर्वांना न्याय मिळावे यासाठी संपूर्ण कामगार युनियन एकत्रित करून तीव्र लढा देण्यात येणार आहे असे प्रतिपादन आयोजित आयटक जिल्हा अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून कॉ शाम काळे जनरल सेक्रेटरी आयटक महाराष्ट्र यांनी केले.
चंद्रपूर येथील कै.कॉ.वसंतराव वानखेडे सभगृहात चंद्रपुर जिल्हा आयटकचे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.या अधिवेशनाचे अध्यक्ष कॉ.प्रकाश वानखेडे केंद्रीय सल्लगार एम एस ई बी वर्कर फेडरेशन तर प्रमुख अतिथी कॉ. दिलीप बर्गी जिल्हा अध्यक्ष आयटक, कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक , कॉ.ज्योती अंडर सहारे राज्य काँसिल सदस्य आयटक, कॉ.वनिता कुंट्टावार राज्य काँसिल सदस्य, कॉ.राजू गैईनवार माजी नगरसेवक , कॉ.सीमा पवार माजी नगर सेवक भद्रावती आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनाची सुरुवात लाल झेंड्याचे ध्वजारोहण करून करण्यात आले त्यानंतर आयटकचे झेंडा गीत सामूहिक रित्या म्हणून उपस्थित नव चैतन्य निर्माण करीत कॉ. ए.बी.बर्धन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व अधिवेशनाला सुरुवात करण्यात आले. या अधिवेशनात सर्वानुमते पुढील तीन वर्षाची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली.ज्यामध्ये कॉ.विनोद झोडगे जिल्हा सचिव व कॉ.दिलीप बर्गि जिल्हा अध्यक्ष यांची दुसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी संघटनेचे महत्त्व सांगून या देशातील शोषित वंचित असंघटित कामगारांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करणे गरजेचे आहे.म्हणून आयटक संघटनेची ताकत बना एकजुटीने लढण्याचा निर्धार करा असे मान्यवरांच्या मनोगतातून सांगण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँ.विनोद झोडगे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन काँ. रवींद्र उमाटे तर उपस्थितांचे आभार कॉ.राजू गैइनवार यांनी केले.
या अधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्यातील संयुक्त खदान मजदुर संघ, एम एस ई बी वर्कर फेडरेशन,डिफेन्स फॅक्टरी युनियन,आशा व गटप्रवर्तक संघटना ,शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन,महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी युनियन,महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना,कृषी मित्र शेतकरी संघटना,आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन इत्यादी संघटनेचे १२५ सदस्य या अधिवेशनाला उपस्थित होते.
0 टिप्पण्या