Ticker

6/recent/ticker-posts

लातूर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली भेट!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर : लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतःवर बंदुकीने गोळी झाडली होती. लातूरात त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर पुढील उपचार करण्यासाठी मुंबई येथील कोकिळा बेन हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभाग क्रमांक २ मध्ये दाखल करण्यात आले असता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य अशोकभाऊ सोनोने, प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांनी आज तातडीने अंधेरी येथील कोकिळाबेन हॉस्पिटल येथे जाऊन त्याचे कुटुंबाची भेट घेतली. त्यांचे वडील आणि नातेवाईक यांचे सांत्वन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या