चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर : उदगीर तालुक्यातील लोहारा गावातील अल्पवयीन मुलीला पाच महिन्यापूर्वी फुस लावून पळून नेण्यात आले पण, पोलीस पाच महिन्यापासून मुलीचा व आरोपीचा शोध योग्यरीत्या न करत असल्यामुळे पीडित मुलीचे वडील उपजिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची दखल प्रशासन घेत नव्हते म्हणून वंचित बहुजन आघाडीने पाठपुरावा केला. व न्याय मिळावा यासाठी धरणे आंदोलन केले. यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या