चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या भारती विद्यापीठ शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल खामगाव मावळ विद्यालयाची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी, व येथील सामाजिक कार्यकर्ते,सुजान पालक मा.गणेश व आश्विनी करंजावणे यांची कन्या कु.जान्हवी गणेश करंजावणे हिने महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
तर इयत्ता पाचवीतील कु. युवराज नितीन दुधाने याने 152 गुण मिळून विद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये विद्यालयातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, पुरंदर-हवेलीचे मा.आमदार तथा संस्थेचे सचिव संजयजी जगताप ,संस्थेचे विश्वस्त प्रा.जाधव एम. एस सर ,सहसचिवव श्री.दत्तात्रय गवळी साहेब, व्यवस्थापक कानिफनाथ आमराळे सर,सह-व्यवस्थापक श्री. रविंद्रपंत जगताप, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. लक्ष्मण गोळे, खामगाव मावळ ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौ संतोषीताई दारवटकर यांनी अभिनंदन केले.
सामाजिक कार्यकर्ते मा. सागर भोसले व उद्योगपती मा. अशोक लोहकरे यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सन्मान केला.
दुर्गम व डोंगरी भागातील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालक वृंदामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
.


0 टिप्पण्या