Ticker

6/recent/ticker-posts

सालेभटटी येथे प्रबोधन व जाहीर सत्काराचा कार्यक्रम संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर:-रमाई भजन मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व जाहीर सत्कार भीम जयंती निमित्त दिनांक 13 4 2025 रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत बौद्ध   कमिटी सालेभटटी तहसील भिवापूर जिल्हा नागपूर येथे भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी रमाई भजन मंडळाच्या गायिका ज्योत्स्ना मेश्राम यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व गीत सादर केले व त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी अध्यक्ष जितेंद्र शेंडे सचिव जयन्द्र नाईक उपाध्यक्ष सचिन मालोदे सहसचिव सुनील फुलझले कोषाध्यक्ष प्रेम मेश्राम अनिल फूलझेले अश्विन नाईक सत्यविजय तांबे अंजली नाईक कांचन मेश्राम प्रतीक्षा शेंडे मीना घोडेस्वार कमला नाईक ललावती शेंडे आचल नागदिवे आम्रपाली फूलझेले साले भट्टी रमाई मंडळाच्या गायिका ज्योत्स्ना मेश्राम वर्षा शेंडे दिक्षा चव्हाण  अर्चना मोटघरे स्वाती वाघमारे वंदना  महेश कर सपना ढेकले उद्धव वाघमारे  बॅन्जोवादक सुरज खडसे ढोलक वादक आदेश खडसे आणि सर्व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन प्रेम मेश्राम यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या