Ticker

6/recent/ticker-posts

बुद्धगया जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडा; वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याची रेल्वे प्रशासनाकडे मागणी !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकोला : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 16 एप्रिल व 17 एप्रिल 2025 ला बुद्धगया येथे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात अकोला जिल्ह्यातून व अकोला जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने महिला व पुरुष सहभागी होणार आहे. त्यामुळे दिनांक 15 एप्रिल 2025 ला सकाळी अकोला व आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांना बुद्धगया येथे जाण्याच्या दृष्टीने सुविधा होण्याकरिता  विशेष रेल्वे अकोला ते बुद्धगया सोडण्यात यावी आणि दिनांक 17 एप्रिल 2025 ला बुद्ध गया येथून सायंकाळी बुद्धगया अकोला विशेष रेल्वे सोडण्यात यावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना निवेदन देऊन बुद्धगया करिता विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, राहुल अहीरे, गजानन गवई, पवन बुटे, गोरसिंग राठोड, किशोर जामनिक, अजय शेगावकर, प्रदीप चौरे, नितीन सपकाळ, पराग गवई, विकास सदाशिव, धीरज इंगळे, प्रदीप पळसपगार, शंकरराव राजुस्कर, सुरेश कल्लोरे, शीलवंत शिरसाट, सुयोग आठवले, शरद इंगोले, शुद्धोधन इंगळे, संजय कीर्तक, विश्वजीत इंगळे, रवी सराटे, अजय कांबळे, गोवर्धन सावळे, शेषराव तायडे, अशोक लोणागरे, संदीप सराटे, योगेश भगत, उमेश शिरसाट, अमोल लाखे मोहन तायडे, विशाल गोटूकडे, संदीप शिरसाट, निलेश लोणागरे आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या