चित्रा न्युज प्रतिनिधी
बीड : काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध वंचित बहुजन आघाडीच्यावतीने व्यक्त करत, या हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांच्या पाठीशी संपूर्ण देश ठामपणे उभा आहे. दहशतवाद्यांनी विकृत मानसिकता संपवावी, शहीद झालेल्या पर्यटकांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर जाधव, इंजि. संदेश डोळस, दीपक कांबळे, उमेश तुळवे, किरण वाघमारे, लखन जोगदंड, प्रेम कांबळे, सिकंदर सरवदे, मिलिंद सरपते, विशाल सूर्यवंशी, निलेश वाघमारे, देविदास वाघमारे, प्रताप धनवे, सौरभ अवसरमल,विकी बोराडे इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या