चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीरला आरटीओ कार्यालय व्हावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत होती.म्हणुन तत्कालीन क्रिडा मंञी महोदयानी एमएच.५५ नंबरचे आर. टी.ओ.कार्यालय उदगीरला मंजूर करुन ते सुरुही केले.म्हणुन आता आपले "टेंन्शन" गेले.असे उदगीर तालुक्यातील वाहनधारकांत बोलले जात असतानाच अलिकडे याच आर टी.ओ.कार्यालयाच्या सुरस कथा , चर्चा कानावर पडतात.यामुळे एम. एच.५५ हे उदगीरचे परिवहन कार्यालय म्हणजे असुन अडचण , नसुन खोळंबा.असे बनले आहे.
कारण,उदगीर-हाळी-अहमदपुर या राज्य मार्गावर रोज शेकडो ओव्हर लोडेड गाड्या धावतात.तसेच नंबर व कागद पञ नसलेली आणि मुदत संपलेली शेकडो वाहने या रोडवरुन धावतात.आणि या बाबत पेपरबाजी करुन व अधिका-याच्या कानावर घालुनही याकडे अधिकारी महाशय लक्ष देत नाहीत.तर शेतकरीबांधव शेतीमाल घेऊन उदगीरच्या आडतीत जात असेल तर त्या वाहनांना न चुकता अडवुन त्या चालकांना ना- ना प्रश्न व कागदपञ विचारुन त्या चालकाला व शेतक-याला भंडावून व प्रसंगी कॅश घेऊन सोडून देतात. अशी चर्चा शेतकरी व वाहनधारक करत असल्याचे ऐकू येते.
शेतीमाल आडतीला घेऊन जाणा-या वाहनांच्या शुल्लक चुका दाखवुन त्यांना बुका लावणा-या परिवहन विभागातील लोकांना उदगीर हाळी अहमदपुर रोडवरुन रोज धावणारी ओव्हर लोडेड व नंबर तसेच कागदं नसलेले वाहने दिसत नाहीत,का?
उदगीरला परिवहन कार्यालय सुरु झाले तेंव्हा पासून अनेकदा परिवहन अधिका-याला सांगुन तसेच पेपरला बातम्या देऊनही नंबर नसलेल्या, मुदत संपलेल्या व ओव्हर लोड माल असलेल्या गाड्यांवर कारवाई न करणा-या परिवहन विभागाच्या वतीने शेतीमाल वाहतूक करणा-या वाहनांना अडवून त्याला शुल्लक चुकांवरुन हजारो रुपयांचा "बुका" लावला जातो.तो "बुका" खरोखरच शासन दप्तरी जमा होतो का? याचा शोध घेऊन उदगीर-हाळी-अहमदपुर रोडवर धावणा-या ओव्हर लोड , नंबर नसलेल्या,मुदत संपलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे धाडस वरीष्ठ तरी दाखवणार का व कधी??


0 टिप्पण्या