Ticker

6/recent/ticker-posts

दिसताच उघडी डी.पी.हंडरगुळीकरांचा वाढतोय बी.पी.


चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-३३ के.व्ही.वीज उपकेंद्र हाळी येथून हंडरगुळी परिसरातील शेती,घरगूती व्यावसायीक वापरासाठी विजेचा पुरवठा केला जातो.यासाठी वेग - वेगळ्या जागेत,वेग-वेगळ्या नावाने डी.पी.उभा केल्या आहेत.त्यातीलच एक डी.पी.हंडरगुळीत "माळी डीपी" या नावाने बसविली आहे.आणि या डी.पी.वर सतत लोड येत असल्याने फ्यूज उडणे,जाळ होणे.असे प्रकार सर्रास घडत असतात.म्हणुन बिच्चारे वीज ग्राहकांना ना-ना प्रकारचा ञास सहन करावा लागतोय.तरीपण माळी डी.पी.चे दुखणे {फाॅल्ट} कायमचे नाहीसे व्हावे,यासाठी एमएसईबी मेहनत घेत नाही.म्हणुनच या डीपी चा सतत बिघाड होऊन लाईट ये- जा करते.तसेच माळी डी.पी.सताड उघडी असल्याने अनेकांचा बी.पी. वाढू शकतो! 
कारण,या उघड्या डी.पी.मुळे कधी   एखादी दुर्देवी घटना घडेल याचा नक्की भरवसा नाही.तेंव्हा या माळी नावाच्या डी.पी.चा कायमचा बिघाड/फाॅल्ट काढूण ग्राहकांना सुरळीतपणे व योग्य दाबाने वीज पुरवठा करता येत नसेल तर किमान डी.पी.ला दरवाजे तरी बसवावेत.अशी चर्चा माळी डी. पी.वरील ग्राहकांमधून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या