चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-रामनवमी शोभायात्रा स्थानिक मैया सखी ग्रुपच्या वतीने रामजींच्या लहान सेनेंच्या गरिमामय, भक्तिमय व मनमोहक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ही शोभायात्रा संता जी वॉर्ड स्टील रेसिडेन्सी येथून जलाराम मंदिरापर्यंत काढण्यात आली. ५ वर्षांपासून १३ वर्षांपर्यंतच्या मुलांनी पांढरे वस्त्र, कपाळावर तिलक, डोक्यावर लाल फेटा, हातात धर्मध्वज आणि मुखातून श्रीरामाचे नाव व जयघोष करीत राम-सीतेच्या अलौकिक झांक्यांसह ही शोभायात्रा काढली.
रामभजन, श्रीराम स्तुती व हनुमान चालीसा यांचे सादरीकरण करण्यात आले. सक्षमच्या बासरी आणि रामच्या हार्मोनियमच्या जुगलबंदीने सर्वांचं मन जिंकलं. राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व हनुमान यांच्या रूपातील मुलं अतिशय गोड दिसत होती.
शरबत व प्रसाद वाटप करण्यात आले.
या शोभायात्रेत सुषमा मूंदडा, ज्योती झंवर, उर्मिला सारडा, गीता सारडा, विजया काबरा, भगवती जाजू, मंगला हेडा, शोभा मंत्री, रेणु कटकवार, रेखा गुप्ता, शैलजा शर्मा, दिशा अग्रवाल, निकिता सिमरन बुधवानी, भारती रूपारेल आणि इतर सख्यांनी व मुलांच्या पालकांनी सहकार्य केले. सिंधी समाजाच्या वतीने झेंडे वाटप करण्यात आले.
ही अनोखी शोभायात्रा सर्वत्र प्रशंसनीय ठरली आहे.
0 टिप्पण्या