• नागरिकांना पत्रकाराची गरज केव्हा पडते याचे केले स्पष्ट वक्तव्य •
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : जनतेसोबत जेव्हा सत्य स्थिती असूनही पैश्याच्या देवाणघेवाण मधून जर त्यांना न्याय मिळत नसेल तर अश्यांना पत्रकार आठवतो. जनतेच्या पैशाची काही विभाग उधळपट्टी करतो व हे जनता सांगायला भितात तर तोच भ्रष्टाचार समोर आणायला पत्रकारांची गरज पडते. कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार तुमच्या आवाजाला त्याची निर्भिड लेखणी बनवून ते सत्य प्रशासनापुढे व जनतेसमोर आणतो. म्हणूनच जनतेहो आपण निर्भिडपणे आपली समस्या, गैरप्रकार, झालेला अन्याय, भ्रष्टाचाराची उदाहरणे पत्रकार व मिडीयाला सांगा. त्याची आमचे संघातील पत्रकारांकडून दखल घेतली जाईल असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी जनतेसमोर स्पष्ट केले आहे.
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. सामान्य लोकांना जेव्हा धनाढ्य लोकांकडून त्रास दिला जातो, खोट्या गुन्ह्यात अडकवून गोरगरीबांच्या जागा जमिनी हडपले जातात. पैशाच्या जोरावर धनदांडगे लोक प्रशासनाला पैश्याची देवाणघेवाण करून त्या माणसाचे सत्य असूनही त्यासोबत अन्याय केला जातो अश्या वेळी त्याच सामान्य लोकांना पत्रकारांची नितांत गरज असते. निर्भिड व निस्वार्थी पत्रकार हा बेधडकपणे तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लेखणीतून वाचा फोडतो. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकारांचे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणा-या कलम १९ ( १ ) "अ" नुसार पत्रकाराला आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध लिहीण्याचे, गैरप्रकार समोर आणन्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे. म्हणूनच जनतेहो आपण निर्भिडपणे जागरूक होऊन आपली समस्या, झालेला अन्याय, जनतेच्या पैशात झालेला घोटाळा, आर्थिक फसवणूक, आर्थिक देवाणघेवाणात न्याय न मिळणे, गरीबांच्या जागा जमिनी पैशाच्या जोरावर हडपण्याचे षडयंत्र असे भरपूर प्रकरणे उघडकीस येऊन सुद्धा एक सामान्य माणूस काहीही करू शकत नाही. अश्या वेळी या सर्व समस्या महाराष्ट्र शासन मा. प्रा. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघातील पत्रकारांकडे निर्भय होऊन सांगाव्यात. तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वृत्तपत्र, प्रेस मिडीया द्वारे त्यावर वाचा फोडण्याचे काम आमचे पत्रकार करतील असे जाहीर आवाहनही राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी केले आहे. तर आपली समस्या बेधडकपणे पत्रकारांना सांगितली पाहिजे आणि भारतीय न्याय व्यवस्थेत आपल्याला न्याय हक्क घेण्याचा पूर्ण अधिकार आहे ही जाणीव ठेवून जनतेने निःसंकोचपणे आपली भूमिका पत्रकारांपुढे मांडावी असे संजीव भांबोरे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या