Ticker

6/recent/ticker-posts

लोहगावात २०० आणि ५०० च्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी केला पर्दाफाश


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे- बनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाकडून पर्दाफाश करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दि- १७/०४/२०२५ रोजी कोटक महिंद्रा बँकेचे मॅनेजर यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्या बँकेचे सीडीएम मशिन मध्ये २०० रूपये दराच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आले आहेत अशा तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. ५९/२०२५ भा.न्या.स कलम १७८, १७९, १८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल होताच पोलीस तपास पथक गठीत करून त्वरीत तांत्रिक विश्लेषण करण्यात आले . आरोपीताचा शोध घेवून आरोपी नामे मनिषा स्वप्निल ठाणेकर, नागपुर चाळ, येरवडा, पुणे, भारती तानाजी गवंडरा मोयो गोसावी, राजपाल सी १०, केशवनगर, चिंचवड, सचिन रामचंद्र यमगर, वय ३५, रा गहुंजे, पुणे, यांना दिं- १८/०४/२०२५ रोजी अटक करण्यात आले. अटक आरोपीताकडे कसून तपास केला असता त्यांच्याकडे या नोटा कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून प्राप्त केले असल्याचे समजले. कोल्हे नावाच्या इसमाबाबत अधिक माहिती प्राप्त केली असता त्याचे नाव नरेश भिमप्पा शेटटी रा लोहगाव, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले तेव्हा त्याच्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरामध्ये २००/- रुपये दराचे बनावट नोटांचे २० बंडल ज्याचे बजारातील मुल्य ४,००,०००/- रुपये, ख-या नोटा २,०४,०००/- रुपये, नोटा छापण्याचे प्रिंटर , ५००/- रुपये दराच्या ए४ साईजचे १,११६ कागदांवर प्रत्येक कागदावर ४ नोटा या प्रमाणे एकुण २,२३२ प्रिंट केलेल्या नोटा ज्याचे बाजाराती मुल्य २२,३२,०००/- रुपये, नोटा प्रिंट करण्यास वापरण्यात येणारी शाई, नोटा छापण्याचे कोरे कागद व इतर साहित्य तसेच नमुद आरोपीचे कार क्रं एमएच १२ डब्ल्यु के ३७६१ मधुन बनावट २००/-रुपये दराच्या ६४८ नोटा व तसेच ५०० रुपये ३ बनावट नोटा ज्यांची बाजारातील किंमत १,३१,१००/- रुपये जप्त केले.
या गुन्हयातील इतर आरोपी भारती गवंड यांच्या कडून २००/- रुपये दराच्या ६०,०००/- रुपये किमतीच्या नोटा , आरोपी मनिषा ठाणेकर (पाटील) यांचे कडून बनावट २००/- दराच्या २०,०००/- रुपयांच्या नोटा, सचिन यमगर यांचे कडुन २००/- दराच्या २०,०००/- रुपयांच्या नोटा, असे साहित्य जप्त केले.

आरोपी नरेश शेटटी यांचे अधिक तपास करण्यात आला तेव्हा या गुन्हयामध्ये त्यास आरोपी प्रभू गुगलजेडडी याने मदत केली असल्याचे तांत्रिक विश्लेषनावरून त्यास देखील अटक करण्यात आली. या आरोपी कडून २००/- दराच्या ३,०००/- रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेले आहे. या गुन्हयातील सर्व आरोपींचा दि-२९/०४/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिंमाड घेण्यात आला असून आज पर्यंत गुन्हयातील सर्व आरोपीताकडून एकूण २८,६६,१००/- रुपयांचे २०० व ५०० रुपयांचे बनावट नोटा व २,०४,०००/- रुपयांच्या ख-या नोटा व इतर साहित्य गुन्हयात वापरलेल्या कारसह जप्त करण्यात आले आहे. गुन्हयातील नोटा छापण्यास वापरण्यात आलेले लॅपटॉपमालक व तसेच इतर आरोपीतांचे नावे निष्पन्न झाले असून त्यांचा कसोशीने शोध सुरू आहे.
तपासाची हि कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१, संदिपसिंह गिल्ल, सहा पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), चंद्रकांत सुर्यवंशी, सहा पोलीस निरीक्षक के बी डावेराव, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख (एटीसी) यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या