Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस निरीक्षक निलेश देसलेंविरूद्ध तक्रारींवर पोलीस अधिक्षक नंदूरबार यांचे चौकशीचे आदेश

आदिवासी फिर्यादींस अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करून लाॅकअपमध्ये बंद करणे;आदिवासींची तक्रार नाकारणे,आरोपींस वाचवणे,सामाजिक कार्यकर्त्यास धमकी देणे असे निलेश देसलेंवर गंभीर आरोप

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार : शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी पिंपर्ळे व शिरूर दिगर येथील आदिवासी समाजातील पिडीत फिर्यादी व्यक्तीस जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून मारहाण करणे,आदिवासी महिलांची तक्रार न घेणे,फिर्यादी आदिवासी जखमी व्यक्तीलाच लाॅकअपमध्ये बंद करून ठेवणे,मराठा समाजाच्या आरोपींनी मोकाट सोडून देणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना ,तुम्ही आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा ३५४ चा गुन्हा दाखल करतो,अशी धमकी दिल्याबद्दल निलेश देसले यांच्यावर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा,पदावरून तात्काळ हटवा व शहादा पोलीस ठाणे अंतर्गत आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचारांसंबंधित कार्यवाही करा, याबाबत पोलीस अधीक्षक नंदूरबार श्रवण दत्त यांना बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी एक तक्रार अर्ज देण्यात आला होता.त्या तक्रार अर्जाची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दखल घेत चौकशी लावली आहे.तक्रार अर्जाची चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई करतो,असे आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले होते.
                 चौकशी आदेशात नमूद करण्यात आले आहे की,आपण दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी मा.पोलीस अधीक्षक नंदूरबार यांचेकडे निलेश देसले प्रभारी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्याविरुद्ध केलेला तक्रारी अर्जाची चौकशी आमच्याकडे देण्यात आली आहे.सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आपलेकडे समक्ष विचारपूस करून जबाब नोंदविणे आवश्यक असल्याने आपणास दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आपल्याकडे उपलब्ध असलेले कागदोपत्री पुराव्यासह अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याची समजपत्र देण्यात येत आहे.असे पत्र आशित कांबळे ( भा. प्र.से.)अपर पोलीस अधीक्षक नंदूरबार यांनी तक्रारदार सुशिलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स संघटना यांना दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी पाठविले आहे.निलेश देसले पोलीस निरीक्षक ठाणे यांच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती कारवाई करणार आहेत, याकडे जनतेचे लक्ष घालून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या