चित्रा न्युज प्रतिनिधी
मोहाडी :- तालुक्यातील हरदोली येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त, त्रिरत्न बुद्ध विहार, बौद्ध सम्राट अशोक स्मारक समिती हरदोली तालुका मोहाडी जिल्हा भंडारा द्वारा आयोजित, दिनांक-15/04/2025 रोज मंगळवार ला सायंकाळी 9 वाजता सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भिम शाहीर प्रदीप कडबे आणि संच, बुद्ध भीम गीतांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे आणि संच, यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन केले त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, सर्वश्री विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे शाहीर अरुण मेश्राम, बॅन्जो मास्तर जहागीर गजभिये, नाल वादक शाहीर गणेश मेश्राम, अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने, शंकर मोतकार, दिलीप मेश्राम, तबलावादक धनराज बागडे, ललित गौरीकर, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, अशोक डोंगरे, चेतन देशभ तार, गंधलाल मेश्राम, आनंद भोयर, जितेंद्र भोयर, बादल देशभ तार, राजकुमार गजभिये, देवानंद मेश्राम, राजा नंद मेश्राम, राहुल गजभिये, रूपाली गजभिये, दिलदार गजभिये, हरीश देशभ तार, इत्यादी त्रिरत्न बुद्ध विहार हरदोली संपूर्ण पदाधिकारी उपासक आणि उपाशी का गावातील नागरिक गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 टिप्पण्या