चित्रा न्युज प्रतिनिधी
अहमदनगर : देशाची मिलिटरी ॲक्शन घ्यायला तयार आहे, पण राजकीय नेतृत्व जे आहे, ते निर्णय घ्यायला तयार नाही. सरकारने निर्णायक निर्णय घ्यावा म्हणून, मुंबईतील हुतात्मा स्मारकासमोर २ मे रोजी तीन वाजता आम्ही एकत्र जमणार आहोत, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. अहमदनगर येथील कोतुळ येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबई असणाऱ्या लोकांना, ज्यांना ज्यांना वाटते की सरकारने कारवाई करायला पाहिजे, त्या सर्वांनी उपस्थित रहावे.
एका आवजात आम्ही तुमच्या सोबत आहोत, तिजोरीत पैसे नसतील तर सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्ही ऍक्शन घ्या. कच खाऊ नका, हे सांगण्यासाठी दोन तारखेला एकत्र जमणार आहोत आणि सरकारला भाग पाडणार आहोत. हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नसून देशाच्या राष्ट्र ध्वजाखाली सर्वांनी एकत्र यायचे आहे.
0 टिप्पण्या