Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री आवास योजनेत मुदत वाढ द्या; वंचित बहुजन आघाडी मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकोला : प्रधानमंत्री आवास योजना  सेल्फ सर्वे करत असताना लाभार्थ्याला जॉब कार्ड नंबर आवश्यक आहे आणि जॉब कार्ड नंबर हा पंचायत समिती स्तरावरून मिळतो. अनेक ठिकाणी एमआरईजीएस ऑफिसमध्ये कर्मचारी कमी असल्यामुळे लाभार्थ्यांना जॉब कार्ड मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामसचिवांच्या आयडीवरून सुद्धा सर्वे करत असताना त्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. स्वतः सेल सर्वे करत असताना सर्वप्रथम जॉब कार्ड नंबर मागत आहे, तो जॉब कार्ड नंबर ग्राम पंचायत स्तरावर मिळत नाही, म्हणून लाभार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आमचे हक्काचे घरकुल आम्हाला मिळते की नाही, म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरून जॉब कार्ड तयार करण्याची परमिशन द्यावी व टप्पा दोन सेल सर्वे सुरू असताना अंतिम दिनांक 30- 4 -2025 असून शासनाने एक महिना मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्यावतीने निवेदन देण्यात आले.

मुदतवाढ न दिल्यास वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर, बार्शीटाकळी, पातुर, बाळापूर, तेल्हारा, अकोट तालुक्यात पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, तर अकोला तालुक्याच्यावतीने अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. मुदत वाढ न दिल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या