चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -तालुक्यातील पहेला येथून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथे ज्ञानोबा तुकाराम वारकरी सेवाश्रम वेलतूर सद्गुरु जोग महाराज वारकरी गुरुकुल दत्त मंदिर निमगाव येथे सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर व श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन तिथी वैशाख कृष्णपंचमी 17 मे 2025 रोज शनिवार ते ज्येष्ठ शुक्ल षष्ठी 1 जून 2025 पर्यंत सद्गुरु जोग महाराज गुरुकुल दत्त मंदिर निमगाव येथे आयोजन करण्यात आलेले आहे. वरील शिबिराला ह .भ .प .गु .सुमन महाराज देशपांडे ,ह .भ. गु .चैतन्य महाराज झंजाळ, ह .भ .प गु.भगवान महाराज माहुरे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात येणाऱ्या शिबिरार्थी यांनी शैक्षणिक सप्ताह गुरुकुल पद्धतीने नुसार केस करताना दुपट्टा ही पोषक पाठापुरते मर्यादित राहतील, ताट ,वाटी प्याला, पेटी कुलूप, अंथरून ,पांघरून तथा वही ,पेन, टाळ सोबत आणावे, प्रवेशा
नंतर कोणत्याही कारणाने सुट्टी मिळणार नाही काही अपरिहार्य कारणास्तव जायचे झाल्यास नियम पूर्वक अर्ज संचालक किंवा वर्ग शिक्षकांकडे सुपूर्त करावा, मृदुंग शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःचे मृदुंग आणणे गरजेचे राहील, शिबिरात पहाटे पाच वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व कार्यक्रमांना हजर राहणे बंधनकारक राहील, मुक्काम शिबिर स्थळीच करावा लागेल, विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता किमान पाचवा वर्ग उत्तीर्ण राहील, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या साहित्याची व जीविताची जबाबदारी त्यांच्यावर राहील, शिबिर स्थळी प्राथमिक औध़ोउपचाराची व्यवस्था राहील वरील शिबिराचे सल्लागार आधारस्तंभ ह भ प डॉ.संजय दादा एकापुरे असून संस्थाचालक ह भ प ओमदेव महाराज चौधरी यांच्या सहकार्याने सद्गुरु योग महाराज वारकरी गुरु दत्त मंदिर यांचे नियोजन करण्यात येत आहे. वरील शिबिराला शिबिरार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे
0 टिप्पण्या