Ticker

6/recent/ticker-posts

पहेला ते निमगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा


पत्रकार संजीव भांबोरे यांनी केली रस्त्याची पाहणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -तालुक्यातील पहेला ते निमगाव या 3 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून या रस्त्याच्या जागोजागी गिट्टी उघडली असून रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आज दिनांक 14 मे 2025 ला ला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय  संपादक व सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे त्यांनी त्या रस्त्याला भेट देऊन पाहणी केली असता रस्त्याची अत्यंत दयनीय परिस्थिती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे  खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा याप्रकारे या रस्त्याची अत्यंत दैन्यवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या बाबतीत अनेक जण प्रतिनिधी, शासन ,प्रशासन यांना अनेकदा अवगत करण्यात आलेले आहे .परंतु अजून पर्यंत या रस्त्याकडे कोणत्याही जनप्रतिनिधी किंवा शासन प्रशासनाने या रस्त्याची दखल घेतलेली नाही . त्यामुळे क्षेत्रातील जनप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांना विनंती आहे की, त्यांनी पहेल्या कडून निमगाव कडे जाणारा रस्ता तात्काळ नव्याने डांबरीकरण करण्यात यावा  अशी मागणी करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या