चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-2 चाकी वाहनांच्या फटाका सायलेंन्सरवर तसेच डीजे च्या दणदणाटावर जिल्ह्याच्या विविध भागात प्रशासनाने बुलडोझर कारवाई केल्याचे मिडीयाच्या माध्यमातुन समजते. माञ,हाळी-हंडरगुळी येथे यावर कारवाई करायची धमक ना अधिका-यात आहे,ना कर्मचा-यात. यामुळे हाळी-हंडरगुळीत सालभर विविध कार्यक्रमात डी.जे.चा धडाका आणि वाहनांचा फटाका मेनरोड सह गल्लीबोळात वाजत असल्यामुळे हाळीहंडरगुळी या
गावातील लहान मुले व -हदयरुग्ण ञस्त तर प्रशासन मस्त दिसत आहे. डी.जे.चा दणदणाट व वाहनांचा कर्णकर्कश आवाज हा मानवाच्या शरिरासाठी विशेषत: -हदयरुग्ण व लहान मुले यांच्या आरोग्यासाठी हानीकारक / अतिधोक्याचे असल्याचे संबंधित खात्याने जाहीर केले.तरीही या भागात सर्रासपणे व विनापरमीट दणदणाट होत असल्याचे जनतेला दिसते. माञ,प्रशासनातील वरीष्ठांना दिसत कसे नाही.हे एक कोडेच आहे. कोणत्याही वाहनांना त्या-त्या कंपनी मार्फत विविध आवाजाचे सायलेन्सर व हाॅर्न दिले जाते.ते सायलेन्सर कांही रुपयात मेकॅनिक लोकं चेंज करतात,आणि फटाका सायलेन्सर बसवुन देतात.तसेच कर्णकर्कश आवाजाचे हाॅर्नही बसवुन देतात.व कांही "सडकछाप महाभाग" फटाका सायलेन्सर व हाॅर्न वाजवित मेनरोड व गल्लोगल्ली जनतेला राञंदिवस ञास देत हिंडताना दिसतात. परंतू प्रशासनातील कुणालाही दिसत कसे नाही? प्रशासनाच्या मर्जीनेच तर हा धंदा फोफावला नाही,ना?बाहेरचे कांही सडकछाप/लोफर टोळके फटाका हाॅर्न वाजवित हंडरगुळीत हकनाक हिंडतात.जर एखाद्या बुर्जूगाने या बाबत विचारणा करताच हे सडकछाप टोळके त्या बुर्जूग महिला-पुरुष यांनाच अरेरावी करतात.
तरीही सडकछाप टोळक्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन कोणते पंचाग बघत आहे?
गावातील शांतता भंग झाल्यावरच कार्यवाही करणार का?असे प्रश्न हाळी-हंडरगुळीकरातून चर्चीले जात आहेत.
0 टिप्पण्या