Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळी परिसरात निसर्गाचे 3 रंग

 वादळी वारा, पावसाच्या धारा आणि उष्णतेचा मारा..!!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-परिसरात गत 8 दिवसापासून कधी अवकाळीच्या धारा तर कधी वादळी वारा तसेच अंगातून वाहतात घामाच्या धारा !! असे निसर्गाचे तीन रंग बघायला मिळत आहे.
गत 8 दिवसापासून या परिसराला   अचानक वादळी वारे व अवकाळी पावसाचा तडाखा बसत असल्याने उष्णतेपासून कांही प्रमाणात उसंत/ दिलासा मिळाल्याने समाधानाचे ढग अनेकांच्या चेह-यावर दिसत आहेत. एकीकडे गर्मी पासून थोडी 'खुशी' पसरली असलीतरीही पावसामूळे उन्हाळी ज्वारी काळी पडणार ही भीती असल्याने शेतकरीबांधव 'गम' मध्ये दिसत आहेत.
हाळी-हंडरगुळी व परिसराला आठ दिवसापासून राञी,बेराञी व दिवसा ढवळ्या अचानक वादळी वा-यासह  अवकाळी पावसाने झोडपायला सुरु  केल्यामुळे उष्णतेपासून थोडीफार सुटका झाली आहे.
मे च्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाळ्यासारखे वातावरण हाळी व परिसरात निर्माण झाले आहे.अन् या वातावरण बदलाचा परिणाम गुरा ढोरांसह मानवावर ही झाला आहे. 10 मे पर्यंत सकाळी 10 च्या नंतर परिसरातील गावागावात गर्मीमुळे  "कर्फ्यू'" लागल्यासारखे शांतशांत मोहले दिसून येत होते.पण दि.11 मे च्या राञी पासून परिसराला वादळी वारे व अवकाळी पावसाने झोडपून काढायला सुरुवात केले आहे.त्यात विजांचा कडकडाट व ढगांचा गडग- डाट मोठ्या प्रमाणाप होत असल्याने  बालकांसह वयस्करामध्येही भीती पसरली आहे.अशा वातावरणामध्ये घराबाहेर असलेले तात्काळ घरदार जवळ करत असतात.
**************************
ती पाच-दहा घंटे येतच नाही..!!
**************************
गत आठवड्यापासून अचानक अन् कधीही वादळीवा-यासह विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट तसेच अवकाळी पाऊसाने कहर माजवला असल्यामुळे परिसरात 'थोडी खुशी,जादा गम' अशी स्थिती निर्माण झाली आहे.तसेच 'आला, आला वारा,चला लाईट बंद करा' ही मोहिम महावितरणवाले राबवित आहेत की,काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारण,जेंव्हा,जेंव्हा वादळ,पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागताच हाळी येथील वीज केंद्रातून परिसरातील लाईट बंद करण्याचा प्रकार नेहमीचा झाला आहे.म्हणुन एकदा बंद केलेली लाईट पाच,दहा घंटे येतच नाही. परिणामी जनतेला डासांचा चावा सहन करत अंधारात राञ काढावी लागत आहे.व यात नवजात बालकांना जास्त ञास सहन करावा लागत आहे.तेंव्हा विजेचा लपंडाव कमी होणार कधी?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या