Ticker

6/recent/ticker-posts

56 इंचाची छाती निव्वळ गप्पा ; सुजात आंबेडकरांची टीका!


फेक न्यूज पसरवण्यात भारतीय मीडिया पुढे!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भारतीय मीडियावर फेक न्यूज पसरवण्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, युक्रेन-रशिया युद्ध सुरू असताना काही भारतीय मीडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे युद्ध थांबवले असल्याची चुकीची माहिती प्रसारित केली होती. 

मोदींनी भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणतेही युद्ध थांबवलेले नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ५६ इंचाची छाती ही केवळ थाप असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, "जर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला, तर त्याची अधिकृत माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह किंवा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन देशाला द्यायला हवी होती. मात्र, अशा महत्त्वाच्या घटनेची माहिती प्रथम अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटद्वारे दिली होती, हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे."


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या