चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्यावतीने ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त पहलगम येथील शहिद झालेल्या भारतीय नागरिकांना तसेच भारत पाकिस्तान युद्धामधे शाहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहर अध्यक्ष ॲड अरविंद तायडे सह ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाला युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान
केला.
यावेळी ॲड अरविंद तायडे पुणे शहर अध्यक्ष, भारतभूषण कोल्हे, राजाभाऊ ढाले, सतीश साबळे, जितेश सरोदे, तोहसीफ पठाण, बबन धिवार, अनिल साळवे, राजु गुळवे, अमोल मंचक मोरे, जितेंद्र गौतम बगाडे, प्रमोद खंडारे, डॉ धनंजय कदम, मिलिंद सरोदे
विशाल वंजारे, मोहन गाडेकर सह अनेक नागरिकांनी रक्तदान केले.
0 टिप्पण्या