सैन्याच्या पराक्रमाचा केला गौरव....
लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामिण नांदेड
नांदेड :-ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाई साठी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव आणि राष्ट्रीय एकतेची भावना अधिक दृढ करण्याच्या हेतूने आज सकाळी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर समोरून मुख्य रस्त्याने भव्य मोटारसायकल वर तिरंगा यात्रा काढण्यात आली त्याला देश प्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता...
जम्मू-काश्मीरातील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकावर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी तळावर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले त्यामुळे हिमायतनगर शहरातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील मुख्य रस्त्याने तिरंगा रॅली काढून त्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवत भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करून त्या बलिदानांला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल,शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे,सह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांना धडा शिकवणाऱ्या शूर भारतीय सेनेच्या गौरवासाठी हिमायतनगरात तिरंगा यात्रा
0 टिप्पण्या