चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : समाजातील शोषित, वंचित, बौद्ध आणि दुर्लक्षित घटकांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सर्वांगीण प्रगती व्हावी, तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावा या उद्देशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई यांच्या वतीने मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत. संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान विजय जाधव यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू करीत आहोत. हे प्रशिक्षण येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गांमध्ये सर्व विषयांची तयारी करून घेणे, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव, महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी, उत्तरलेखन कौशल्य आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन दिले जाणार आहे. याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
हे वर्ग संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, लोखंडवाला रोड, आर.टी.ओ. कॉर्नर, चार बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३ येथे आयोजित करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, त्यांनी वेळ न घालवता त्वरित नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी: ९१३७९६५२१८, ८३०५५३५३५२, ०२२-२६३३६६७१
या उपक्रमाचा जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे सरचिटणीस आयु. चंद्रकांत बच्छाव यांनी केले आहे.
0 टिप्पण्या