चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-आपण आज कोणत्या समाजात राहतोय..स्वताच्या मुलाला गरीब घरातील मुलगी करायची आणि स्वतःच्या मुलीला मात्र संपत्ती पाहून मोठ्या घरात देऊन टाकायची..त्यासाठी लाखो रुपये कर्ज काढून लाख रुपये हुंडा देऊन महागडी गाडी देऊन टाकायची हे का तर फक्त की आपली मुलगी सुखी राहावी म्हणून..अरे त्यांना जर तुमच्या मुलीचं सुखच हवं असतं तर त्यांनी इतका पैसा आणि हुंडा कधीच घेतला नसता..ही समाजाला लागलेली वाईट सवय आहे.मुलीचे लग्न करताना आधी मुलगा आणि त्या घरचे लोक बघत नाहीत फक्त मुलांची संपत्ती बघतात किती कमावतो ते बघतात त्यापेक्षा आधी ती लोक चांगली आहेत का मुलगा व्यसनी तर नाही ना..मुलांचं कर्तत्व बघा रे..पैसा काय तो उद्या पण कमवता येईल..ज्या घरात आपली मुलगी जाणार आहे ती माणसं नीट पहिली तर पुढे अशी वेळ तुमच्या मुलीवर कधीच येणार नाही..आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच आपल्यावर काही देणं लागत या प्रकरणावर बोलणं खूप आवश्यक आहे.
मुलींनो..लग्न करतांना या गोष्टी तुमच्या सोबत पण घडत असतील तर लग्ना आधीच विरोध करायला शिका..मुलींनो जागे व्हा,लढायला शिका , धाडसी बना,अन्याय सहन करून स्वतः जीव गमवण्यापेक्षा त्या अन्यायावर मात करायला शिका..आता वेळ आली आहे दाखवून देण्याची की,मी ही जिजाऊंची लेक आहे,मी अहिल्याबाई होळकरांची लेक आहे......
कु:- माने नेहा लक्ष्मण
0 टिप्पण्या