Ticker

6/recent/ticker-posts

स्व.बिंदू माधव जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा, १० मे २०२५ – नगर कार्यकारिणी भंडारा ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने स्वर्गीय बिंदू माधव जोशी (नाना) यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम आणि ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन श्री सिध्द चिंतामणी गणेश मंदिर ,फ्रेंडस कॉलनी , खात रोड भंडारा येथे  मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
ह्या कार्यक्रमाला नगर कार्यकारिणी अध्यक्ष श्री. रवींद्र तायडे हे अध्यक्ष स्थानी होते .प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत पर्यावरण सहसंघटक श्री .अतुलजी दिवाकर ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीचे पश्चिम प्रांत संघटन मंत्री श्री. नितीनजी काकडे ,नगर कार्यकारिणी चे सचिव श्री.लोकेशजी मोहबंशी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव श्री. अनिलजी शेंडे आणि संचालन श्री. जयंतजी सब्जीवाले यांनी केले.
यावेळी सुरुवातीला श्री. संजय आयलवार यांनी स्वर्गीय बिंदू माधव जोशी (नाना) यांचे चरित्र आणि कार्य यावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी ग्राहक संरक्षण क्षेत्रातील योगदान, ग्राहक चळवळीचा इतिहास आणि संसदेतून ग्राहक संरक्षण कायदा संमत होण्याची प्रक्रिया यावर सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे यांचे हस्ते फीत कापून ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीचे पश्चिम प्रांत संघटन मंत्री श्री. नितीनजी काकडे यांनी स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या लाभलेल्या भेटीतील अनुभव आणि त्यांची कर्तव्य दक्षता , तसेच ग्राहक संरक्षण आणि भविष्यात ही चळवळ अधिक जोमाने वाढविण्यासाठी आणि त्याची व्यापकता वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना अधिक कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत पर्यावरण सहसंघटक श्री. अतुलजी दिवाकर यांनी स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या सहवासातील अनुभव, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पंचसूत्री यावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक नागरिक कसा स्वयंपूर्ण, सक्षम आणि पर्यावरणपूरक विचारसरणी अवलंबून सामाजिक दृष्ट्या सुजाण जागरूक नागरिक बनू शकतो यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या या अभिनव उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच नगर कार्यकारिणीचे सचिव श्री. लोकेशजी मोहबंशी यांनी ग्राहक हक्क संरक्षणाच्या कार्याबाबत आपली कटीबद्धता व्यक्त करित, या चळवळीसाठी भांडवली योगदान आणि मार्गदर्शनाचे महत्व अधोरेखित केले.
नगर कार्यकारिणी चे सदस्य श्री.चंद्रशेखर साठे यांनी नवीन विद्यूत स्मार्ट मीटर तांत्रिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या ग्राहक यांच्या हितावह नाही याबाबत माही दिली. यासाठी शासकीय यंत्रणेला या नवीन विद्यूत स्मार्ट मीटरला ग्राहकांनी तीव्र नकार देण्यासाठी जोरदार चळवळ व्हावी यासाठी मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा भंडाराचे विधी सल्लागार अधिवक्ता श्री.राहुल देवगडे यांनी सुद्धा त्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
नगर कार्यकारिणी अध्यक्ष श्री. रवींद्र तायडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वर्गीय बिंदू माधव जोशी आणि ग्राहक चळवळीतील योगदान देणाऱ्या महान व्यक्तींचे आचरण अवलंबून धर्म, वंश, जात, वर्ण यापलीकडे जाऊन सामाजिक दायीत्वाने ग्राहक मार्गदर्शनाचे कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्याचे अभिवचन दिले. तसेच या केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री सिध्द चिंतामणी गणेश मंदिराच्या विश्वस्तांचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे:
स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या योगदानावर प्रकाश
ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन आणि उद्दिष्टे
ग्राहक संरक्षण आणि हक्क यावर सखोल चर्चा
ग्राहक चळवळ अधिक जोमाने वाढविण्याचा संकल्प
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचसूत्रीवर मार्गदर्शन

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहक हक्कांसाठी प्रभावी पावले उचलली गेली असून, नव्याने सुरू झालेल्या ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत मिळणार आहे.
कार्यक्रम यशस्वितेकरिता जिल्हा संघटन मंत्री श्री.जयंतजी सब्जीवाले ,जिल्हा सचिव श्री.अनिलजी शेंडे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास जिल्हा तथा नगर कार्यकारिणी चे सदस्य श्री.चंद्रशेखर साठे ,श्री. संजय आयलवार ,मो.सईद शेख ,जेष्ठ कार्यकर्ते श्री.अविनाशजी पनके , प्रा. डॉ. सौ .अनिता महाजन , श्री. भूनेश्वर शिवणकर .श्री. रमेश पारधी , सक्षमचे श्री.गोविंद कापगते , श्री.धनराजजी ढोके ,श्री.हटवार सर,अतुल वर्मा आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सौ. अनिता महाजन यांनी व्यक्त केले.

मा.जिल्हा प्रतिनिधी/ वार्ताहर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या