व्हिएतनाम येथे जागतिक बौध्दधम्म परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतातील धम्म क्रांतिची दिली माहिती
हो चि मिन्ह/ मुंबई - भगवान गैतम बुध्दांना बुध्दगया येथे ज्ञान प्राप्ती झाली.जगाला शांती,अंहिसा आणि मानवतेचा संदेश देणाऱया बौध्दधम्माचा विचार संपूर्ण भारतात आणि तिथुन संपूर्ण आशिया खंडात प्रसारीत झाला.भगवान बुध्दांचा जन्म; ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिब्बाण भारतातच झाले आहे.बौध्दधम्माचा उगम भारतातच झालेला आहे.त्यामुळे भारत ही भगवान बुध्दांची भुमी आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
संयुक्त राष्ट्र संघ(यु.एन.) आणि इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन च्या संयुक्त विद्यमाने बुध्द जयंती महोत्सव निमित्त 20 वी इंटरनॅशनल जागतिक बौध्द धम्म परिषद व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आली आहे.व्हिएतनामची आर्थीक राजधानी असलेल्या हो ची मिन्ह या शहरातील बुध्दिशस्ट युनिवर्सीटीत या दिनांक 6,7 आणि 8 मे अशी तीन दिवसीय जागतीक बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या जागतिक धम्म परिषदेत जभरातील 80 देशांचे प्रतिनिधी बौध्द भंन्ते आणि बौध्द अनुयायी उपस्थित राहिले आहे.या जागतिक धम्म परिषदेत बौध्द नेते आणि भारत सरकारचे केंद्रियमंत्री म्हणुन ना.रामदास आठवले यांनी प्रमुख अतिथी म्हणुन या जागतिक बौध्द धम्म परिषदेत आपले विचार मांडले.
भारत ही बुध्द भुमी आहे.सम्राट अशोका नंतर भारतात सर्वात मोठे धम्मचक्रप्रवर्तन बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले.14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांना बौध्द धम्मांची दिक्षा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केल्याचा इतिहास ना.रामदास आठवले यांनी जागतिक धम्म परिषदेत सांगितला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हला भगवान बुध्दांच्या धम्मांचा मार्ग दाखविला याचा आम्हाला अभिमान आहे.भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुध्दांच्या विचारांना मानतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मानवतेचे समतेचे पुरस्कर्ते होते.विश्वशांती,समता,बंधुता,अंहिसा आणि लोकशाही हे सर्व बौध्द धम्माने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे असे ना.रामदास आठवले यांनी आपले विचार मांडले .जागतिक धम्म परिषदेत जगभरातुन आलेल्या सर्व बौध्दांना
बुध्दपौर्णिमेच्या मंगलमय शुभेचछा ना .रामदास आठवले यांनी दिल्या.या दौऱ्यात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ.सिमाताई आठवले ; राज वासनिक; अविनाश कांबळे; चंद्रशेखर कांबळे; आहेत.


0 टिप्पण्या