Ticker

6/recent/ticker-posts

जर पाकिस्तानने परिस्थिती चिघळवली, तर भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर द्यावे - ॲड. प्रकाश आंबेडकर


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताननचा जळफळाट झाला आहे. 

यानंतर पाकिस्तानकडून पुंछमध्ये गोळीबार करण्यात आलाय. त्यात 12 भारतीयांचा मृत्यू झालाय तर 50 हून अधिक जण जखमी झालेत. या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, जर पाकिस्तानने परिस्थिती चिघळवली तर भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर द्यावे.  

भारताचे पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्युत्तर हे दहशतवादी केंद्रित आणि तणावपूर्ण नव्हते. विशेषतः भारतीय सैन्याने या दरम्यान पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले नाही. 

आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्या नष्ट करत होतो. परंतु पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर, विशेषतः पूंछमध्ये विनाकारण गोळीबार केला आहे. यात अनेकांचा जीव गेलाय.

पाकिस्तानने विनाकारण केलेल्या गोळीबारात आणि तोफगोळ्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना 'शहीद' म्हटले पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांना भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

पाकिस्तान सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवत आहे आणि दावा करत आहे की, त्यांनी भारतीय वायू सेनेचे राफेल जेट पाडले आहे. 

याविरोधात भारताने भारतीय सशस्त्र दलांचे मनोबल वाढवण्यासाठी पाकिस्तानने केलेले हे खोटे दावे जोरदारपणे उघड करावेत. भारताने पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी आपले सर्व राजनैतिक प्रयत्न वापरावेत. आणि जर पाकिस्तानने परिस्थिती आणखी चिघळवली तर भारताने कडक प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या