ढाब्यात मिळते देशी,विदेशी..!
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-नांदेड-बिदर जाणा-या महामार्गावर असलेल्या वाढवणा पाटी नामक फाट्यावर 'ढाबा संस्क्रती' फोफावली असून या पाटीवर ढाब्याच्या आड अवैध देशी-विदेशी मद्याची जोरात विक्री होताना सामान्य जनतेला व प्रवाशांना दिसते.माञ कुठे छोटीशी रेड करणारे आणि मीडियातून पाठ थोपटून घेणारे दारुबंदी अधिकारी व कर्मचारी यांना हे गोरख धंदे दिसत नाहीत का?तसेच ढाब्यात पिणा-या व पिऊ देणा-यावर ही कार्यवाही करण्याचे अधिकार असताना सुध्दा येथील ढाब्यावर प्रशासन मेहरबानी व मैञी का करीत आहे?असे सवाल पाटीवरील सजग जनता प्रशासनाला विचारत आहे.
कांही वर्षापूर्वी सायंकाळी 7 नंतर प्राॅपर वाढवणा येथील जनता आत घराकडे जायला घाबरायची.कारण तेंव्हा पाटीवर वस्ती तर नव्हतीच. पण राञी ७ वा.नंतर चीटपाखरु ही पाटीवर दिसत नव्हते.परंतू काळ बदलला आणि पाटीवर वैध,अवैध असे एक ना अनेक व्यवसाय धाटले असल्याचे आणि पुर्वी येथे ७ नंतर कुणीच दिसत नव्हते.त्या पाटीवर आजकाल राञंदिवस वाहनांचा गोंगाट आणि अवैध(दारु)धंद्याचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे, आणि पाटीवर कोणता इसम काय व कोणता काळा धंदा करतोय.याची डिटेल माहिती असूनही सं.प्रशासन जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेड-बिदर महामार्गावर व उदगीर तालुक्यात असलेल्या वाढवणा पाटी येथील बहूतांश ढाब्यात,लंच होम मध्ये सर्रासपणे राञंदिवस बेकायदा दारुची विक्री व सेवन हा प्रकार सुरु असल्याचे पाटीवरील जनतेतील चर्चे वरुन समजते.
विशेष म्हणजे पाटीवर देशी,विदेशी बार आहेत.तरीही ढाब्यात बेकायदा मदीरा मिळते.कारण,आजकालच्या मदीराप्रेमींना जेथे जेवण मिळते,तेथे मदीरा लागते!म्हणुनच पाटीवरील शासनमान्य देशी,विदेशी बार मधून माल आणेपर्यंत ग्राहक बसायला तयार नाहीत.म्हणुन मग लंच होमचा धंदा मंदा होत असल्याने पाटीवरील लंच होमवाल्यांनी शक्कल लढवली आणि स्व:ता ढाब्याच्या नावाखाली अवैध देशी,विदेशी विक्री व सेवन हा प्रशासनातील मदीरा व खाद्य प्रेमींशी 'मैञी' करुन नवा 'फंडा/धंदा' सुरु केल्याचे समजते.
राज्यातील अनेक ठिकाणचे राज्य उत्पादन शुल्क विभाग 'मिशन ढाबा' हे अभियान राबवतात.म्हणजे ढाबे, लंच होम,खानावळी,हाॅटेल्स यामध्ये मद्य विक्री व सेवन करणे हा गुन्हा आहे.आणि वरील ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील तर तेथे धाड टाकून मद्य सेवन करणारे व विक्री करणारे लोकांवर कार्यवाही केली जाते.परंतू,उदगीरचे राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे 'खाद्य प्रेमींचा गोठा" असे तालुक्यात बोलले जाते !
आणि याला कारण ही तसेच ते म्हणजे वाढवणा गाव व पाटीवर होणारी अवैध दारुची वाहतूक अन् विक्री.ही सामान्यजणांना दिसते.पण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी,कर्मचारी महाशयाला माहिती असूनही दिसेना ! म्हणजे अजबच म्हटले पाहीजे..!
पाटीवरील एका लंच होमवाल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर असे सांगितले की,गाव ते जिल्हास्तरीय प्रशासनातील लोकांशी अर्थपूर्ण 'मैञी' असल्यामुळेच वाढवणा गाव व पाटी येथे अवैध मदीरा वाहतूक व विक्री राञंदिवस धुमधडाक्यात चालू आहे.
*यासाठी स्पेशल मनुष्यबळ आणि अधिकारी असलेला विभाग म्हणजे रा.उ.शुल्क विभाग हा आहे.आणि यांनाच कारवाईचे पुर्णाधिकार आहेत.असे असलेतरीही आम्ही या गैर धंद्यावर वाॅच ठेवुन कारवाई करु, अशी माहिती बी.एस.गायकवाड सपोनी.वाढवणा पो.स्टे.यांनी दिली.
***************************
*पथकांनाही लागेना थांगपता*
म्हणजे येथील लंच होमवाल्यांचे 'नेटवर्क' किती 'स्ट्राॅंग' असेल याचा अंदाज जो,तो आपापल्यापरीने लावत असतो.कारण,आयजी,एसपी व एलसीबी यांनी नेमलेले स्पे.पथकं या भागात येतात आणि मटका,रेती, गुटखा या अवैध धंद्यावर कारवाई करतात.परंतू पाटीवरच्या लंच होम मध्ये चालणा-या अवैध दारु विक्री व सेवनावर तसेच पाटीवरील दुकाना मधून बाहेर गावी जाणा-या बाॅक्स याच्यावर आजवर एकाही पथकाने कारवाई केली नसल्यामुळे पाटीवर असलेल्या लंच होमवाल्यांचे नेटवर्क पथकांपर्यंत तर नाही ना ?
नसेल तर मग एकाही पथकाला वाढवण्यातील व पाटीवरील अवैध मदीरा वाहतूक,विक्री व सेवन याचा थांगपत्ता कसा काय लागत नाही?
*सर्व माहिती तसेच मनुष्यबळ असूनही याकडे दुर्लक्ष का?तसेच वाढवणा गाव व पाटीवरील अवैध मद्य विक्री व वाहतूकीला आर्शीवाद कोण देतय?अशी विचारणा केलो असता,दुर्लक्ष करण्याचा.आर्शिवाद देण्याचा प्रश्नच नाही.आम्ही अनेक भागात धाडी टाकत आहोत.तशी धाड 1 दोन दिवसात वाढवण्यातही नक्की पडेल व संबंधितांवर कारवाई होईल.अशी माहिती रमेश चाटे,निरिक्षक रा.उ.शुल्क विभाग उदगीर यांनी फोनवरुन दिली आहे..
0 टिप्पण्या