Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाधारीत चित्रपट नागरिकांनी बघावे आणि ज्योतीबा फुले यांचे कार्य व आदर्श घ्यावा - ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेचे आव्हान


चित्रा  न्युज प्रतिनिधी 
भंडारा - महात्मा फुले हा १९५४ चा प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.हा चित्रपट समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवनावर आधारित आहे.हा चित्रपट महात्मा फुले यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित बायोपिक आहे.फुले हे महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते.एकोणिसाव्या शतकातील जन्मलेल्या फुले यांनी, त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले आणि इतरांसह मागास जातीतील जनतेच्या उन्नतीसाठी कार्य केले.ते महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते आणि त्यांनी जानेवारी १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली.21 डिसेंबर 1955 रोजी सादर झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी (रजत कमल) पहिले प्रतिष्ठित राष्ट्रपती रौप्य पदक जिंकले.फातिमा शेख,ज्यांना आधुनिक भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते, त्या समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंसोबत मिळून महिला आणि दलित मुलांसाठी शिक्षण देण्याचे काम केले.त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनआधारित चित्रपटाने महाराष्ट्रमध्ये गाजला असून आजच्या तरुण पिढीने आदर्श घेऊन हा चित्रपट नक्की बघा असे आव्हान ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेने केले आहे.

प्रतिक्रिया

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित निघालेला चित्रपट हा आजच्या तरुणांना भुरळ घालणारे असून ज्योतिबा फुले, सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी जी शिक्षणाची क्रांती घडविले ती समाजाला पुढे घेऊन जाणारी असून याच निमित्ताने ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेच्या पदाधिकारी यांनी हा चित्रपट बघितला असून सर्व जाती धर्मातील लोकांनक हा चित्रपट बघा असे सुद्धा आव्हान केले आहे.

संजय मते
ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या