Ticker

6/recent/ticker-posts

मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नवी मुंबई : भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई
 जिल्ह्याच्यावतीने ९० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यक्तिमत्व विकास शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर (मोफत), विजय झनके उपाध्यक्ष (संस्कार)
यांच्याकडून ग्रंथ वाटप करण्यात आले.
 
महाउपासिका मीराताई यशवंत आंबेडकर यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त ९० (नव्वद) पुस्तकांचे आयु. विजय झनके यांनी वाटप केले आहे. भैय्यासाहेब आंबेडकर भवन, पंचशील बुद्ध विहार, तुर्भे स्टोअर नवी येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे आयोजन दि बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया नवी मुंबई जिल्हा शाखा महिला व पुरुष यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आले होते. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभाताई कांबळे होत्या. सोबत प्रकाश माने गुरुजी, संजय झनके, छायाताई दिवे, दत्तात्रेय हार गुरुजी, प्रकाश भालेराव गुरुजी, राजेंद्र झेंडे, प्रा. गौतम सोनकांबळे, आनंद बोधी निकाळजे, अलकाताई आढाव, कविता कांबळे, कल्पना कांबळे उपस्थित होते. यावेळी शाखेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक/ शिक्षिका, बौद्धाचार्य, उपासक/ उपासिका या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या