चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे ससून रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून सिटी स्कॅन मशीन बंद पडली असून यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे गैरसोय झाली आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली आहे, तसेच उपचारासाठी वेळ लागत असून यामुळे एखादा रुग्ण दगावू शकतो, त्यामुळे प्रशासनाने सिटी स्कॅन मशीन त्वरित सुरू करावे अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता/डिन डॉ.एकनाथ पवार यांना देण्यात आला.
यावेळी वंचितचे युवा शहर अध्यक्ष सागर आल्हाट, युवा नेते योगेश राजापूरकर, गौतम तायडे, हेमंत ओव्हाळ, विजय मेंढे, आनंद ढेबरे, सचिन सरोदे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे प्रज्योत गायकवाड, शंकर नवगिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या