वंचित बहुजन आघाडी रायगड उत्तर बैठक संपन्न!
चित्रा न्युज प्रतिनिधी
रायगड : वंचित बहुजन आघाडीची रायगड जिल्हा उत्तरची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कमिटी महासचिव धर्मेंद्र मोरे, राहुल गायकवाड, उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, देवेंद्र कोळी, अशोक वाघमारे, नारायण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम कम्युनिटी हॉल, खोपोली, रायगड या ठिकाणी संपन्न झाली.
त्यागमूर्ती रमाईमाता यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस सुरुवात करण्यात आली. यामध्ये सर्व तालुका/शहर यांचा कामाचा आणि सध्य स्थितीचा आढावा घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 4 महिन्याच्या आत घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्याने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी करीत असताना वंचित बहुजन आघाडी रायगड उत्तर अंतर्गत सर्व तालुका/शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. येऊ घातलेल्या निवडणुका कशा हाताळयाच्या, तसेच राजकीय बरोबर सामाजिक प्रश्न आणि सामाजिक प्रगती यावर भर देऊन आगामी काळात पक्ष अधिक प्रगतीपथावर नेण्या करीत सर्वांनी जोमाने कामाला लागावे आणि निवडणुकीमध्ये वंचितच्या विजयाची आखणी करावी, अशा सूचना जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
युती आघाडीचा प्रस्ताव जिल्हास्तरावर जिल्हा कमिटीने करण्याचा हिरवा कंदील पक्षाकडून देण्यात आला असला तरी प्रत्येक तालुका/शहाराचा स्वतंत्र आढावा घेऊन येऊ घातलेली निवडणूका पार पाडल्या जातील कोणत्याही तालुका/शहर पदाधिकाऱ्यांनी युती आघाडी बाबत परस्पर वलग्ना करू नयेत अशादेखील सूचना यावेळी करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष आणि महासचिव यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि इतर कार्यकर्त्याना केले आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीबरोबर भारतीय बौद्ध महासभा तन, मन, धनाने सोबत असेल असे आश्वासन यावेळी भा.बौ.म.स.जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड आणि महिला जिल्हाध्यक्ष उषाताई कांबळे यांनी केले. यावेळी जिल्हा भा.बौ.म.स.ऑडिटर संदीप गाडे, खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव, आशिष मणेर, कुणाल पवार, संतोष मर्चंडे, अखिल शेख, ज्योती खाडे, प्रशाली मोरे, मिताली वाघमारे, पंकज गायकवाड, तुकाराम खंडागळे, स्वप्नील गायकवाड, साईनाथ म्हात्रे, किशोर वाघमारे, प्रदीप ढोले, अमीना शेख, अक्षय उबाळे, प्रमिला गायकवाड,सुवर्णा वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या