निवडणूकीत यश मिळवण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार !
चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व महानगर निवडणूक संदर्भात अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडी समन्वयक म्हणून माजी आमदार ऍड. नतीकोद्दीन खतीब यांची नियुक्ती झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, फुले-आंबेडकर विद्वत्त महासभा, अकोला महानगर या सर्व विंगच्या जिल्हाध्यक्ष, महासचिव, तालुका अध्यक्ष महासचिव शहराध्यक्ष महासचिव महानगराध्यक्ष महासचिव पदाधिकाऱ्यांची बैठक अकोला जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक समन्वयक एड नतीकोद्दीन खतीब यांच्या अध्यक्षतेखाली व्हीआयपी सर्किट हाऊस अकोला येथे संपन्न झाली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन म्हणून अरुंधती ताई शिरसाट, राजेंद्र भाऊ पातोडे, बालमुकुंजी भिरड, प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, आम्रपाली ताई खंडारे, श्रीकांत घोगरे, प्रा. सिद्धार्थ देवधरीकर, संगीताताई अढाऊ यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये अकोला जिल्ह्यातील येणाऱ्या निवडणुकी संदर्भात जिल्ह्यातील तालुक्याचा व महानगराच्या संदर्भात जिल्हा समन्वय एड नतीकोद्दीन खतीब साहेब यांनी पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मत जाणून घेतले.
अकोला जिल्ह्यातून आलेल्या सर्व वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिवस-रात्र एक करून येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. बैठकीमध्ये अकोला जिल्हा समन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल एड नातिकुद्दिन खतीब यांचा सत्कार करण्यात आला, तर औरंगाबाद, हिंगोली जिल्हा समन्वयक म्हणून अरुंधतीताई शिरसाठ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच आंबेडकरी चळवळीचा अकोला जिल्ह्याचा 104 वर्षाचा इतिहास अकोला पॅटर्न पुस्तकातून लिहिणारे राजेंद्र भाऊ पातोडे यांचाही सत्कार यावेळी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
या बैठकीला अकोला पश्चिम शहर अध्यक्ष मजहर खान महासचिव गजानन गवई, मनोहर बनसोड, अशोक दारोकार, डॉ धर्माड, किशोर जामणीक, सुनील सरदार, गोरसिंग राठोड, पवन बुटे, रोशन फुंडकर, शरद सुरवाडे, शरद इंगोले, अजय अरकराव, वंदनाताई वासनिक, सुवर्णाताई जाधव, मंतोषी ताई मोहोळ, लक्ष्मीताई वानखडे, अनुराधा ताई डांगे, मंगलाताई शिरसाट, वैशालीताई कांबळे, सुनिता ताई हेरोडे ताई, अर्चनाताई डाबेराव, जयदावी ताई, सम्राट तायडे, मिलिंद दामोधर, सुबोध डोंगरे,आशिष रायबोले, विक्की डोंगरे, राऊत, वैभव खडसे, राजेश दारोकार, प्रवीण पोहरकार, गोपाल कराळे, कौसल्याताई साबळे, उज्वला ताई गडलिंग, रेखाताई गवई, मायाताई हिवराळे, लताताई कांबळे, ललिता ताई तेलगोटे, भाऊराव सोनवणे, निखिल ऊपरवट, रवी वानखडे, सिद्धार्थ डोंगरे, आकाश जंजाळ, दा. दा. गवई इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या