चित्रा न्युज प्रतिनिधी
उस्मानाबाद : स्वाभिमान दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. विकास बनसोडे, रमेश गंगावणे, शेखर बनसोडे यांनी प्रत्येक वर्षीप्रमाणेच कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या रक्तदानासाठी 36 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला व रक्तदान केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव कळंब विधानसभेचे उमेदवार अँड प्रणीत डिकले, डॉ भास्कर साबळे, बालाजी शिंगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा ताई लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश पांडागळे, कुणाल गायकवाड , नामदेव वाघमारे,अशोक कांबळे, नंदकुमार हावळे, नंदु सोनवणे, गौतम बनसोडे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अक्षय बनसोडे, आनंद गाडे, सचिन गायकवाड ,प्रकाश डाके आदींनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या