विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
लग्नकार्यात आलेल्या काही मोजक्या श्रीमंत पैसेवाले व मोठ्या लोकांचे स्टेजवरून नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच आलेल्या इतर सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराचा अप्रत्यक्षपणे अपमान समजावा का?
ते म्हणजे वेळात वेळ काढुन आले आणि बाकीचे येणारे काही रिकामटेकडे आहेत का? त्यांना गर्दी गोळा करण्यासाठी बोलाविले असते का? अशा फालतू प्रथा बंद करायला पाहिजेत, असे सुचवावेसे वाटते. विवाह सोहळ्यातील भाषणंही बंद होणं आवश्यक वाटते. प्रतिष्ठित असोत की पुढारी, कुणाचेही शाल, हार, पुष्पगुच्छ व शब्दसुमनानी स्वागत करणे हेही बंद केलं पाहिजे. (काही व्यक्तींना सत्कार वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी घेवू नये असे मनापासून वाटते मात्र अशा स्थितीत कधी माईक हातात न मिळालेला सुत्रसंचलन करणारा इतक्या वेळेस नाव पुकारतो की शेवटी त्याला नाईलाजाने सत्कार स्विकारावा लागतो मात्र असा अपवाद वगळता बहुतेक स्वतःहून आपले नाव सत्कारासाठी व शब्दसुमनांनी नाव पुकारावे म्हणून स्वतः नाव देणारे महाभागही समाजात वावरताना दिसतात. प्रतिष्ठित मान्यवरांचे नाव घेऊन स्वागत करायचे म्हणजे लग्नाला पैसे खर्चून येणारे बाकीचे हॉलमधील सगळे समाजबांधव अप्रतिष्ठीत असतात का? नाही ना?? निमंत्रणाचा स्वीकार करून वधु वरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्वच समाज बांधव आणि भगिनी, आप्तेष्ट तसेच मित्रपरिवार देखील आलेले असतात, जे विवाह सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहून सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवितात. तेव्हा प्रारंभीच उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींचे शाब्दिक स्वागत करून पुढील विवाह विधी नियोजित वेळेवर पार पाडण्याची काळजी घेतली पाहिजे, असे सुचवावेसे वाटते.🙏
0 टिप्पण्या