चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा:-12 मे 2025 सोमवार रोजी बुद्ध जयंती दिनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तहसील अंतर्गत राहेरी बुद्रुक येथे दुपारी 4 वाजता लॉंगमार्च संघर्ष भूमीवर लॉन्गमार्च प्रणेते आदरणीय प्रा .जोगेंद्रजी कवाडे सर यांनी भेट दिली. असता संघर्ष भूमीवर भगवान गौतम बुद्धाच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बुद्ध जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर विश्वशांती बुद्ध विहाराला भेट देण्यात आली त्यांच्यासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले विजय गवई कैलास नरवाडे गौतम कासारे विकास कासारे अमोल गवई एमडी गवई मधुकर शिंदे इत्यादी बुलढाणा जिल्ह्याचे नेत्यां सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या