Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी संघटनांच्या लढ्याला यश;आदिवासींच्या जमिनी परत मिळायला सुरवात

जिल्हाधिकारी यांना चंद्रकांत रघुवंशीविरोधात जमिनमालकाची तक्रार

चित्रा न्युज प्रतिनिधी
 नंदूरबार  : मौजे टोकरतलाव शिवारातील गट नंबर ३ शेतजमीन अवैद्य, बेकायदेशीर, बोगस व बनावट रित्या श्री.चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी संरक्षित कुळाचे हक्क व अधिकार डावलून मिळकतीमधून बेदखल करण्याचा प्रयत्न केला असल्याबाबतची तक्रार श्रीमती जानीबाई अखात्र्या ठाकरे राहणार टोकरतलाव ता.जि.नंदुरबार यांनी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांच्याकडे केली आहे.निवेदन देताना जानिबाई अखात्र्या ठाकरे जमिनीची मूळ मालक, टोकरतलाव आणि विविध सामाजिक कार्यकर्ते व ॲडवोकेट राहूल कुवर, रोहिदास वळवी,रवींद्र वळवी ,पंकज वळवी,राकेश वळवी, अजय वळवी ,योगेश गावीत आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                     चंद्रकांत रघुवंशी विधानपरिषद सदस्य शिवसेना शिंदेगट  यांनी नंदूरबार जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी  आदिवासींची जमीन बेकायदेशीर रित्या हडप केली होती.त्याविरोधात नंदूरबार जिल्ह्य़ातील कट्टर आदिवासी संघटनांनी दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर काढला होता.मोर्चात बिरसा फायटर्स, भारत स्वाभीमानी संघ ,भारत आदिवासी संविधान सेना, विश्व आदिवासी सेवा संघटना,बिरसा आर्मी आदि विविध आदिवासी संघटनांनी सहभाग नोंदवला होता.आदिवासींच्या जमीनी ह्या मूळ आदिवासी मालकांना मिळाव्यात, अशी संघटनांची मुख्य मागणी होती.या मैदानी लढ्याचा परिणाम होऊन नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळायला सुरुवात झाली आहे.जे आमदार ,खासदारांना जमले नाही,ते आदिवासी संघटनांनी करून दाखवले.
                 ८० वर्षांच्या आजीबाईंना आपली टोकरतलाव नंदूरबार येथील जमीन परत मिळत असल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.आदिवासी संघटनांच्या पुढाकाराने या जमीनीवर  जेसीपी व ट्रॅक्टर फिरवून ही जमीन मूळ मालकाला परत मिळवून देण्यासाठी , जमीन मशागत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.हा आदिवासी संघटनांच्या एकजूठीचा विजयच म्हणावा लागेल. 
                          आदिवासींची जमीन ही बिगर आदिवासींच्या नावे होत नाही. असा कायदा असतांना चंद्रकांत रघुवंशी व काही गैर आदिवासींनी, भूमाफियांनी  ह्या आदिवासींच्या जमिनी अनाधिकृत पणे हडप केल्या. त्याविरोधात सर्व आदिवासी संघटनांनी व आदिवासी समाजाने एकजूटीने लढणे ही आजची गरज आहे.तरच ख-या अर्थाने  आदिवासी हा जल,जंगल, जमीन चा राजा ,या देशाचा मुळनिवासी ठरेल. अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या