चित्रा न्युज प्रतिनिधी
मुळशी :-दिनांक 20मे 2025 रोजी पुनवळे येथील गायकवाड नगरात केब्रिज स्कूल जवळ या क्षेत्रातील भूमिपुत्र म्हणूला ओळख असणारे राजेंद्रभाऊ गायकवाड यांनी नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावेत या उद्देशाने मानकर डोसा रेस्टॉरंट स्थापित केले. येथे दक्षिणात्य चवीचे सर्व स्वादिष्ट खाद्य पदार्थ उपलब्ध असून या परिसरातील अशा या अद्वितीय रेस्टॉरेंट चे 20 मे रोजी संध्याकाळी सन्मानीय आमदार शंकरभाऊ जगताप याचे हस्ते फीत कापून मोठ्या थाटात उदघाट्न करण्यात आले. यावेळी आमदारांसोबत पिंपरी चिंचवड मनपाचे लाडके माजी सभापती चेतनभाऊ भुजबळ,विलासराव गायकवाड, राजेंद्र गायकवाड,आदी मान्यवराची उपस्थिती होती.
सर्वप्रथम राजेंद्रभाऊंचे खास शुभचिंतक म्हणून उपस्थित येथील रोज अस्टर सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक बबन पाटील, पत्रकार अशोक वस्तानी, कवी सतीश भालेराव, सोनावणे, मोरे सर, भास्कर जोशी, गायक केशव काळपांडे, नीलकंठ स्वामीजी, दत्तात्रय वैद्य, यांनी बुके देऊन आमदारांचे स्वागत केले.
यावेळी गायकवाड नग्रातील वनविभागाचे जमिनीवर प्रस्तावित कचरा डेपोचे प्रस्तावाला गायकवाड नग्रातील नागरिकांनी विविध आंदोलनाचे माध्यमाने विरोध नोंदविला होता या कचरा डेपोच्या प्रस्तावाला रद्द करण्या करिता तरुण तडफदार नेते चेतनभाऊ भुजबळ यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याला आमदार जगताप यांनी मेनी करून शासनाला सदर प्रस्ताव रद्द करण्यास भाग पडल्या बद्दल राजेंद्र गायकवाड व रोज अस्तरचे ज्येष्ठ नागरिकांनी बुके देऊन आमदार जगताप व चेतनभाऊंचे आभार व्यक्त केले
0 टिप्पण्या