Ticker

इच्छुक उमेदवारांसाठी वधू-वर व घटस्फोटीत परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी 

मुंबई : सुशिक्षित युवक-युवती व नवजीवनाची संधी शोधणाऱ्या घटस्फोटीतांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई , महिला विकास विभागाच्या वतीने भव्य वधू-वर व घटस्फोटीत परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा रविवार, १ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता विजय जाधव सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, लोखंडवाला रोड, आरटीओ कॉर्नर, चार बंगला, मुंबई–४०००५३ अंधेरी (प.) येथे आयोजिला असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयु. विजय जाधव असतील.

या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुशिक्षित उमेदवारांची चांगली संख्या उपलब्ध असून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना सहभागी होण्याची संधी दिली जात आहे. इच्छुक उमेदवारांसाठी वधू-वर व घटस्फोटीतांसाठी नवजीवनाची नवी संधी देणारा हा मेळावा समाजात समतेचा संदेश देतो. दर शनिवार-रविवार सकाळी ११ ते २ या वेळेत इच्छुक उमेदवारांची नोंदणी सुरू असते. केंद्राचे सरचिटणीस आयु. चंद्रकांत बच्छाव यांनी सर्व इच्छुक उमेदवारांनी या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:

9137965218 / 8305535352 / 022-26336671

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या