Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा फायटर्सच्या ३७० व्या शाखेचे पिंपर्डे येथे जल्लोषात उद्घाटन!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा : ११ मे २०२५ रोजी बिरसा फायटर्स गांव शाखा पिंपर्डे ता.शहादा जि.नंदुरबार या शाखेचे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या शुभहस्ते व  महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी सह महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधील पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. बिरसा फायटर्सची ही ३७० वी नवीन शाखा आहे.
            या कार्यक्रमात बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,शिरपूर तालुकाध्यक्ष नरेश पावरा, मध्यप्रदेश पानसेमल अध्यक्ष विजय बर्डे,प्रकाशा गांव अध्यक्ष एकनाथ भील, डामरखेडा गांव अध्यक्ष आकाश भील, वडगांव गाव अध्यक्ष राहूल पावरा,कृष्णा पावरा,शहाणाचे पप्पू अवाया,कैलास पवार, टूकीचे दिलीप मुसळदे,लोहाराचे सुरेश पवार, रामदास मुसळदे आदि बिरसा फायटर्स पदाधिकारी व पिंपर्डे गांवातील आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
               पिंपर्डे गाव अध्यक्ष पदी दिपक वाघ,उपाध्यक्ष विकास ठाकरे,कार्याध्यक्ष रवींद्र भील,कोषाध्यक्ष ईश्वर भील,सचिव दिपक ठाकरे,सहसचिव शरद भील,सल्लागार गंगाराम पवार,प्रसिद्धीप्रमुख प्रविण ईशी,महिला प्रतिनिधी विमल बाई वाघ व सदस्य पदी खंडू ईशी,मच्छिंद्र वाघ,रायसिंग वाघ,सुनिल पावरा,दिनेश पटले यांची निवड करण्यात आली.नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या